श्रीक्षेत्र आलेगाव हे सांगोला तालुक्यातील एक प्रसिद्ध तिर्थक्षेत्र आहे. ह्या देवस्थानाला साधारणपणे ५०० वर्षांचा इतिहास आहे. सर्व पंचक्रोशीत सर्वात जागृत देवस्थान म्हणून ह्या देवस्थानाची ख्याती दूरवर पसरलेली आहे. देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो ह्याची प्रचीती ह्या देवस्थानापासून येते. आपल्या भक्तांच्या संकटाला धावून येणारा देव, म्हणजेच आलेगावचे श्री. सिध्दनाथ. आपला भक्त संकटात आहे, व त्याच्या मदतीला श्री. सिध्दनाथ धावून गेला नाही असे कधीच झाले नाही. आजही देवाला बोललेला नवस फेडण्याकरिता येणाऱ्या भक्तांची संख्या कमी नाही. श्री सिध्दनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तात सर्व जातीचे, पंथाचे, विविध क्षेत्रातले भक्तगण आहेत. एका लहानशा मंदिरापासून एका सर्वमान्य अशा तिर्थक्षेत्रापर्यन्तचा हा प्रवास अचाट व अचंबित करणारा आहे.

ह्या संकेत स्थळाच्या माध्यमातून श्री. सिध्दनाथ ह्यांचा अल्पअसा परिचय देण्याचा आमचा मनोदय आहे. श्री क्षेत्र आलेगावंच्या इतिहासाविषयी व महतीविषयी आपणास माहिती व्हावी ह्या उद्देशानेच आमचा हा एक लहानसा प्रयत्न आहे. ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून श्री सिध्दनाथ देवस्थानचे विविध कार्यक्रम, त्यांचा इतिहास ह्यांचा अल्पसा परिचय करून देण्यात आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व सिध्दनाथ भक्तांचे मन:पुर्वक आभारी आहोत.

नविन कार्यक्रम


श्री सिध्दनाथाच्या यात्रेची सांगता दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजी झाली.

यात्रोस्तव २०१८

दसरा २०१७

महाप्रसाद २०१७

मंदिराचे इतर सामाजिक उपक्रम