"श्री. सिध्दनाथ देवस्थान " ही छोटेखानी पुस्तिका प्रसिद्ध झाल्यापासून मनामध्ये एक सुप्त इच्छा होती की "श्री. सिध्दनाथाची" इंटरनेटवर एक वेबसाईट (संकेतस्तळ) असावी. "श्री. सिध्दनाथाने " माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत, वेबसाईटची इच्छा सुद्धा त्यांनी पूर्ण केली आहे.
आलेगावंचे श्री. अनिल नामदेव कांबळे (Director-Accusoft Solutions India Pvt. Ltd.) ह्यांनी खुप मेहनतीने व विचारपूर्वक ही वेबसाईट बनवली आहे. ते भाईंदरला व मी मीरारोडला राहायला असल्याने वरचेवर भेटीगाठी होऊन वेबसाईट तयार झाली आहे. ज्यांची श्री. सिध्दनाथावर भक्ती, प्रेम, आस्था असेल अशा भक्ताला ही वेबसाईट पाहील्यानंतर एक वेगळीच अध्यात्मिक अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.
हे कार्य पूर्णत्वास नेण्याबद्दल श्री. अनिल नामदेव कांबळे व त्यांचे सहकारी ह्यांचे मी आभार व्यक्त करतो.
आपला दासांचा दास

डॉ. सुभाष रा.सोनंदकर (आयुर्वेदाचार्य,पत्रकार,समुपदेशक,समाजसेवक)

काही दिवसांपूर्वी डॉ. सुभाष सोनंदकर ह्यांनी श्री. सिध्दनाथ देवावर लिहिलेले पुस्तक वाचनात आले. मी स्वत: मुळचा आलेगावचा व त्याहूनही अधिक श्री. सिध्दनाथ देवाचा भक्त असल्यामुळे माझा ऊर अभिमानाने व देवाच्या भक्तीने भरुण आला. डॉ. सुभाष सोनंदकर ह्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही देवाच्या नावाने काहीतरी करावे असे माझे मन मला सांगत होते. श्री. सिध्दनाथाचे भक्त संपूर्ण देशात आणि विदेशातही आहेत. बर्‍याच भक्तांना आपल्या देवाची महती व इतिहास माहित नाही. आपल्या सिध्दनाथाच्या जागृततेची माहिती आपल्या पुढच्या पिढीला व्हावी ह्यासाठी श्री. सिध्दनाथाच्या आशिर्वादाने व डॉ. सुभाष सोनंदकर, श्री. समीर पाथरे (MD-Accusoft Solutions India Pvt. Ltd.) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मला हे कार्य करण्याची स्फूर्ती आली. ह्या संकेतस्थळाचा माध्यमातून आपल्या जागृत अशा श्री. सिध्दनाथाची महती सार्‍या जगतात सुविख्यात व्हावी हीच श्री. सिध्दनाथचरणी प्रार्थना.

श्री. अनिल ना. कांबळे (संचालक: Accusoft Solutions Ind. Pvt. Ltd.)

आजच्या कॉम्पुटरच्या युगात आलेगावच्या श्री. सिध्दनाथाचे दर्शन व महती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या आलेगावकरांना व्हावी ह्या उद्देशाने श्री. अनिल कांबळे यांनी सुंदर वेबसाइट (संकेतस्तळ) निर्माण केल्याबद्दल व श्री. सिध्दनाथाची संशोधनयुक्त परिपूर्ण माहिती लिहिल्याबद्दल डॉ. सुभाष सोनंदकर यांचे अभिनंदन करून धन्यवाद देतो. श्री. सिध्दनाथ सर्वांच्या मनोकामना पूर्ण करोत.

श्री. गुलाबराव पाटील (अध्यक्ष - सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ)

कांबळे (चर्मकार) समाजाची सिध्दनाथावर अपार भक्ती, श्रद्धा आहे. मला असे वाटते की सिध्दनाथामुळे आपल्या समाजाला मोठा मान सन्मान मिळाला आहे. देवावरच्या अपरंपार भक्तीमुळे देव आपल्याला सर्व कामात यश देतो. आपला कांबळे समाज कोठेही असो तो देवाचा हा उत्सव कधीच चुकवत नाही. कितीही मोठे काम असले तरीही ते सिध्दनाथाच्या सेवेला हजर असतात. आपल्या समाजाला हा तो मान, सन्मान श्री. सिध्दनाथामुळे मिळाला आहे तो असाच कायमस्वरूपी सुरु ठेवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची व मदतीची गरज आहे.

श्री. सचिन कांबळे (सदस्य - श्री. सिध्दनाथ देवस्थान उत्सव समिती)

विशेष आभार

श्री. किसन कांबळे

श्री. दिलीप कांबळे

श्री. सदानंद कांबळे

श्री. बाळासाहेब गुरव

इतर

विशेष सूचना

श्री. सिध्दनाथावरील ह्या संकेतस्थळाच्या कामी माहिती दिल्याबद्दल आम्ही वरील सर्वांचे आभारी आहोत. ह्या माहितीत जर काही चूक अथवा त्रुटी आढळ्यास क्षमस्व. कृपया आपल्या सूचना व अभिप्राय आम्हास aneel.kamble@gmail.com आणि drsonandkar@ymail.com वर कळवावेत.