असे आपले "श्री सिध्दनाथ" देवस्थान सांगोला पासून रस्त्याने १६ कि. मी., पंढरपूर पासून ४९ कि. मी., सोलापूर पासून ८६ कि. मी., पुण्यापासून २४३ कि. मी. व मुंबईपासुन ३८८ कि. मी. अंतरावर आपरूपा नदीकाठी वसलेल्या आलेगावात आहे. श्री सिध्दनाथ हा संकटाला धावणारा आहे. म्हणून 'सिध्दनाथा धाव' अशी भक्तगण हाक देतात. देव भक्तांच्या हाकेला ओ देतो व भक्तांची संकटे दूर करून त्यांचावर शांती व सुखाची बरसात करतो. म्हणून गुलाल खोबरे उधळीत सर्वानी म्हणा....

श्री सिध्दनाथांच चांगभलं...
देवाच्या पालखीचं चांगभलं...
देवाच्या छबीन्याचं चांगभलं...
देवाच्या घोड्याचं चांगभलं...
देवाच्या काठीचं चांगभलं...

786 satta king