देवाची आरती


जयदेव जयदेव जय सिध्दनाथा |
आरती ओवाळू जोगेश्वरी कांता ||धृ|| जयदेव जयदेव...
सिध्दनाथा तुमची आज दावा काशी |
उत्तरेहून देव आले दक्षिण देशी ||१|| जयदेव जयदेव...
येऊन झाली स्वामींची ही काशी|
नव्हते नगर तेव्हा या पंचक्रोशी ||२|| जयदेव जयदेव...
छप्पन पलंग फडके भगवे निशाण |
वर टोलेजंग षण्मुख शंकर शिवलिंग ||३|| जयदेव जयदेव...
विभुतिचे भुषण चर्चोनी अंगे|
रिद्धी, सिद्धी, जोगाई घेऊनी संगे ||४|| जयदेव जयदेव...
गंगा अपरुपेच्या काठी, उभा राहिला जगजेठी |
भक्तांची वाट पाहतो, मन विच्छेला पुरवीतो ||५|| जयदेव जयदेव...
लावून कापूराच्या वाती, घेऊन भावे दास ओवळीती |
होऊन घोड्यावरती स्वार, तारण्या आला भक्ताकारण ||६|| जयदेव जयदेव...
कानी सोन्याच्या मुद्रीका, शिरी शोभती जटा |
अंगी भस्माचे लेपन, गळा रुद्राक्षांचे लेण ||७|| जयदेव जयदेव...
धन्य तुमचा अवतार जगी, या रौद्र धारी |
भक्त रूप मूर्ती भयंकर, परी भक्तास तारी ||८|| जयदेव जयदेव...
काशी क्षेत्र वास तुमचा, तुम्ही तेथील अधिकारी |
तुमच्या नामस्मरणे पळती पिशाच्चे सारी ||९|| जयदेव जयदेव...
कनवाळू कृपाळू ऐशी तव किर्ती |
क्षुद्र जीव, माझे अपराध सांगू किती ||१०|| जयदेव जयदेव...
कृपा करावी सदैव मजरवती |
हिच माझी आपल्या चरणी विनंती ||११|| जयदेव जयदेव...
786 satta king